#MarathaKrantiMorcha क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद, लातुरच्या बैठकीत निर्णय

हरी तुगावकर
रविवार, 22 जुलै 2018

लातूर : मराठा आंदोलनाचा परीघ केवळ पंढरपूर अन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाच्या पुजेपुरता सीमित नाही. आरक्षणाची ही लढाई ते मिळेपर्यंत सुरूच रहाणार असून ता. 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी या प्रश्नी महाराष्ट्र बंद
करण्याचा निर्णय येथे रविवारी झालेल्या मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कमोर्तब करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वासघात करुन घेण्यासारखे झाले आहे. 58 मोर्चे काढून हाती काही लागले नाही
व सरकारने जाहीर केलेल्या सवलतीतून पदरी काहीही पडले नाही. दिशाभूल करा अन वेळ मारुन न्या हा कावा सरकारने अवलंबला आहे. आता मूक न राहता ठोकपणेच यास उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

सरकारच्या भूमिकेचा संतप्त शब्दांत अनेक युनकांनी समाचार घेतला. शिवनीती (गनिमी कावा) तंत्राने व जाहीरपणे आंदोलने करण्यात येणार असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले. ता. 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबादेतून मराठा क्रांती मूक मोर्चास सुरुवात झाली होती. 'भारत छोडो,' 'करो या मरो' या निश्चयाचा वस्तुपाठ असलेली ऑगस्ट क्रांतीही याच दिवशी सुरू झाली होती. त्यामुळे या दिवसाचे ऐतिहासिक महत्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला. यासाठी राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व गावा-गावांतील नागरीकांना याबाबत अवगत करुन हे आंदोलन ऐतिहासीक करण्याचे या बैठकीत ठरले.

मराठा लोकप्रतिनिधींप्रती संताप

मराठा लोकप्रतिनिधींनी मराठा समाजाच्या प्रश्नांप्रती बा‌ळगलेल्या मौनाबाबत तरुणांनी प्रचंड संताप व्यक्त केला. स्वार्थासाठी सोयीपुरता वापर करणाऱ्या अशा स्वकीयांनीच समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप करीत त्यांना त्यांची जागा दाखवा असेही आवाहन या बैठकीतून करण्यात आले.

Web Title: #MarathaKrantiMorcha Maharashtra will stop from revolutionary day