#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

राजेभाऊ मोगल
बुधवार, 25 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलेल्या शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

औरंगबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलेल्या शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 ऐतिहासिक मुक मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मागील चार दिवसांपासून समाजाने रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाधव यांनी ठीय्या आंदोलन सुरु केले होते.

दरम्यान, बुधवारी (ता.25) पत्रकार परिषद  घेऊन राजीनाम्याची घोषणा केली होती. आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े यांना ई-मेलने राजीनामा पाठवला असून उद्या गुरुवारी विधान भवनामध्ये जाऊन राजीनाम्याची प्रत सदर करेल. एक तर आरक्षण द्या नाहीतर राजीनामा स्विकारा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: #MarathaKrantiMorcha MLA harshavardhan jadhav resign letter