आमदार हर्षवर्धन जाधव यांचे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या होत आहेत. हे गंभीर आहे. सरकार कधी आरक्षण देणार, सरकारने त्वरित यासंदर्भात अध्यादेश काढला पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज (सोमवार) मंत्रालयासमोरच्या गांधी पुतळ्याच्याखाली ठिय्या आंदोलन सुरु केले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्या होत आहेत. हे गंभीर आहे. सरकार कधी आरक्षण देणार, सरकारने त्वरित यासंदर्भात अध्यादेश काढला पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली.

राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन सहजपणे घेत आहेत. एकीकडे राज्यात आरक्षणासाठी आत्महत्या होत असताना, गृहराज्यमंत्री मात्र अतिशय उथळपणे हे प्रकरण हाताळत असतील तर हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचेच आमदार असून त्यांनी सेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांना घरचा आहेर दिला आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha MLA Harshwardhan Jadhav agitation