'अजून थोडावेळ मी तिथे थांबले असते तर...' अभिनेत्रीला आठवला 'तो' भीषण प्रसंग

Marathi Actress Manva Naik had bad experience at Hariyana
Marathi Actress Manva Naik had bad experience at Hariyana

मुंबई : हैदराबादमधील 26 वर्षीय डॉक्टर तरूणीवर बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळण्यात आले. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण देशातून या घटनेचा विरोध होतोय व संताप व्यक्त केला जातोय. असे पाशवी कृत्य करणाऱ्या लोकांनाही जाळून टाकले पाहिजे अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. या संशयितांबाबत लगेच निकाल लागून त्यांना कडक शिक्षा अशी मागणी सगळ्याच स्तरांतून केली जात आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला एक भीषण प्रसंग फेसबुक पोस्टद्वारे शेअर केलाय.

मराठी अभिनेत्री मनवा नाईक हिनेही हरियानामध्ये एका वाईट प्रसंगाला तोंड दिल्याचे तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे. मनवाला हरियाना ते दिल्ली विमानप्रवास करायचा होता. यावेळी ती हरियानाच्या विमानतळावर जाण्यासाठी गाडीतून प्रवास करत होती. ती सांगते की, 'नेमके त्याचवेळी माझ्या मनात निर्भयाबाबत विचार येत होते. एकीकडे मी माझा गुगल मॅप सुरू ठेवला होता व दुसरीकडे माझे पता माझ्याशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत होते. त्याचवेळी गाडी टोल भरायला थांबली. ड्रायव्हर टोल भरण्यासाठी खिडकी खाली केली, तर समोर गणवेशात थांबलेले 9 पुरूष माझ्याकडे निरखून बघत होते. त्यांचे ते रूप बघून माझ्या हृदयाचे ठोकेच थांबले. त्यातील एक माणूस मला बघून गाणं म्हणू लागला. मला अवघडल्यासारखं झालं. ड्रायव्हरने तेथून लवकर गाडी काढावी असे मला वाटत होते आणि त्याने गाडी लगेच पुढे नेली... जर त्याने गाडी लगेच पुढे नेली नसती तर?' अशी पोस्ट मनवाने फेसबुकवर लिहिली आहे.

मनवाच्या या पोस्टवरून आपण कल्पना करू शकतो की, देशातल्या मुलीला आता बाहेर फिरतानाही भिती वाटू लागली आहे. आजूबाजूचे वातावरण कसेही असले, तरी तिच्या मनात तेवढेच विचार सुरू असतात, की आपल्यासोबत काही बरं-वाईट घडेल का... वाईट विटार न करता मुलींना फिरणे अवघड झाले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik) on

हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून, त्यानंतर तिला जाळून टाकण्यात आले. ती कोणाकडेच मदत मागू शकली नाही. एका निष्पाप मुलीचा जीव गेला. यानंतर पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे व आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com