धान्य न उचलणाऱ्या आठ लाख शिधापत्रिकाधारकांची तपासणी; अपात्र, बोगस ठरण्याची शक्‍यता 

ration card holders
ration card holders

तळोदा (नंदुरबार) : ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यातील जवळपास सात लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाच महिने धान्य न उचलणाऱ्यांच्या शिधापत्रिका अपात्र, बोगस अथवा अनुत्सुक असण्याची शक्यता निर्माण झाली असून, अशा शिधापत्रिकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने धान्य उचल न करणारे शिधापत्रिकाधारक असतील, तर त्यांची शिधापत्रिका रद्द अथवा अपात्र होऊन नवीन पात्र लाभार्थ्यांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यात आधार आधारित AePDS प्रणाली यशस्वीपणे सुरू झाली आहे. या प्रणालीद्वारे संगणकीकृत शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येते. मात्र, ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या कालावधीचा आढावा घेतला असता सात लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचलच केली नसल्याचे दिसून आले आहे. 

धान्य उचलीचे प्रमाण ९० टक्‍क्‍यांपर्यंत
दुसरीकडे धान्याची उचल न झाल्यामुळे राज्याचे एकूण धान्य उचलीचे प्रमाण ८८ ते ९० टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहात आहे. तसेच राज्याला दिलेल्या ७००.१६ लक्ष इष्टांकाएवढे लाभार्थी आरसीएमएस प्रणालीवर संगणकीकृत झाल्यामुळे नवीन शिधापत्रिका लाभार्थ्यांची नोंदणी आरसीएमएस प्रणालीवर करता येत नाही. यामुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळल्याशिवाय नवीन पात्र लाभार्थ्यांची निवड करणे शक्य नसल्याचे समजते. 

करण्यात येणारी कार्यवाही 
- या शिधापत्रिकांची तपासणी होईपर्यंत त्यावरील धान्य तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात येणार आहे. 
- जिल्हानिहाय उचल न केलेल्या शिधापत्रिका आरसीएमएस प्रणालीमध्ये तपासणीकरिता सर्व शिधापत्रिकावाटप निरीक्षकांच्या लॉगिनमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत. 
- सर्व जिल्ह्यांतील शिधापत्रिकांची तपासणी करून अशा शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. 
- कागदपत्रांची पडताळणी करून १४ फेब्रुवारीपर्यंत लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावे लागून, योग्य त्या योजनेत वर्ग करण्यात येणार आहे. 

जिल्हानिहाय धान्य उचल न केलेल्या शिधापत्रिका 
नगर- १८२५४ 
अकोला- १५५०१ 
अमरावती- ११८२१ 
परळ (ए) विभाग- २३६९६ 
औरंगाबाद- २२४१२ 
बीड- २१४०८ 
भंडारा- २५९४ 
बुलडाणा- १८१४३ 
चंद्रपूर- ४७७८ 
धुळे- १४८३८ 
अंधेरी (डी) विभाग- ३९१०६ 
वडाळा (इ) विभाग- ८७१८२ 
ठाणे (एफ) विभाग- ११०५५५ 
गडचिरोली- ४०५५ 
गोंदिया- ३०७३ 
कांदिवली (जी) विभाग- ३४४०० 
हिंगोली- ६८०७ 
जळगाव- २८५४० 
जालना- ११४५७ 
कोल्हापूर- ७७७५ 
लातूर- १६६४७ 
नागपूर (डीएसओ)-८६५९ 
नागपूर (एफएसओ)- ११६७९ 
नांदेड- १८७४५ 
नंदुरबार- १५४८५ 
नाशिक- ३६८३७ 
उस्मानाबाद- ७९७५ 
पालघर- ४२००४ 
परभणी- १५३५१ 
पुणे (डीएसओ)- ८६४१ 
पुणे (एफएसओ)- १०८६४ 
रायगड- १६२१३ 
रत्नागिरी- १५७७३ 
सांगली- ५७४३ 
सातारा- ५४०२ 
सिंधुदुर्ग- २४६२२ 
सोलापूर- ११३३१ 
सोलापूर- १७९५ 
ठाणे- ५३५१ 
वर्धा- ५९६३ 
वाशीम- ५५८३ 
यवतमाळ- १८११० 
एकूण- ७९५१६८ 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com