Good-Evening
Good-Evening

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली... एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी... भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा... Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाला नाही सहन अन् ती सरसावली

लंडनमधील उच्चायुक्तमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन झाले. मात्र, या परिसराबाहेर काहींनी झेंड्याचे दोन तुकडे करत फाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एएनआयच्या महिला पत्रकाराने त्याला विरोध करत त्यांच्या हातातून झेंडा हिसकावला.

- एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी

भुतानमधील युवा वैज्ञानिक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. मला विश्वास आहे, की एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिकही सॅटेलाईट बनवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

- हुतात्मा जवानाच्या पत्नीला दिले घर बांधून, बघा गृहप्रवेशाचा अनोखा व्हिडिओ

मध्य प्रदेशातील बेटमा गावात हुतात्मा जवानाच्या पत्नीला गावकऱ्यांनी घर बांधून दिले मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी आपल्या हाताच्या पायऱ्या करून या जवानाच्या पत्नीचा गृहप्रवेश केल्याने सोशल मीडियावर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- प्रश्न सोडवा; नाहीतर लोकांना सांगून धुलाई करेन ‌: गडकरींची अधिकाऱया़ंना तंबी

आठ दिवसांत समस्या सोडवा, नाहीतर मी सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेऊन तुमची धुलाई करा, असे सांगेन अशी तंबी परिवहन विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

- मोदींसाठी 'जेएनयू'चे नाव बदला : भाजप खासदार

एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले. याबाबतचा व्हिडिओही जारी करण्यात आला आहे.

- रामराजे 'घड्याळ' उतरविणार; भाजपकडे तीन मतदारसंघाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे रथी महारथी नेते पक्षांतर करत असताना आता पक्षाचे दिग्गज नेते व शरद पवार यांचे विश्वासू रामराजे निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्धार केला आहे.

- भारताच्या 'उसेन बोल्ट'वर क्रीडामंत्री झाले फिदा (व्हिडिओ)

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एका तरुण धावपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरूण अनवाणी पायांनीसुद्धा 100 मीटर इतके अंतर अवघ्या 11 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याची कमाल करून दाखवत आहे.

- Sacred Games नंतर प्रचंड व्यस्त झालाय 'गणेश गायतोंडे'

आपल्या अभिनयाने थाेड्याच दिवसात बाॅलिवूडला भूरळ घालणारा अभिनेता म्हणजे नवाजुुद्दीन सिद्दिकी हाेय. सध्या व्यस्त अभिनेत्यांपैकी ताे एक आहे. नवाज एकाचवेळी तीन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.

- 'मोस्ट हँडसम पुरुष' ठरल्यानंतर हृतिक म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा जगातील सर्वात हँडसम पुरूष ठरला असून, त्याने हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे.

- तुमची पत्नी सतत शॉपिंग करते का? मग हे वाचाच

माझी पत्नी काटकसरीने संसार करत नाही. ती सतत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत राहते. मॉलमध्ये गेल्यानंतर नको असलेल्या वस्तू ही भरमसाठ खरेदी करते. तिच्यासोबत राहणे मला अवघड होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com