गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Good-Evening
Good-Evening

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा... 11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा

पूरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

- मोदी सरकारच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्यांनाही मिळणार गृहकर्ज

शेतकऱ्याला नवे घर घ्यायचे असल्यास गृहकर्जाचा मार्ग सहजपणे उपलब्ध नसतो. कारण, गृहकर्जासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची आणि अटींची पूर्तता तो करू शकत नाही.

- आम्ही स्वाभीमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री विनोद तावडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

- मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.

- आमच्यावर सरकारचे खूप प्रेम, आम्हाला याची सवय : शर्मिला ठाकरे

आमच्यावर सरकारचे खूप प्रेम आहे  अशी आम्हाला सवय आहे, असा टोला शर्मिला ठाकरे यानी सरकारला लगावला आहे.

- 11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट

भारताचा कर्णधार विराट कोहली याने काल (ता.18) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्याने ट्विटरवर अत्यंत भावनिक पोस्ट केली आहे.

- अनुष्कानं शेअर केला बिकनीतील फोटो; पाहा विराटची कमेंट

अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सक्रिय असून अनुष्का शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.

- World Photography Day : प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी हे आहेत 5 बेस्ट कॅमेरे

फोटोग्राफीला सुरवात करणाऱ्या प्रत्येकासाठी Canon 1300D, 800D, 200D, Sony A6000, Nikon D5300 हे कॅमेरे खूप चांगले आहेत. प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी कोणते कॅमेरे चांगले आहेत याचे काही पर्याय.

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com