गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

काश्मीरमध्ये जवानांच्या 280 तुकड्या तैनात... भाजप खासदारांचा 'क्‍लास' सुरू... WhatsApp चे नवे फिचर लाँच... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- काश्मीरमध्ये जवानांच्या 280 तुकड्या तैनात

श्रीनगरची चहूबाजूंनी नाकाबंदी केली असून येणाऱ्या- जाणाऱ्यांची अत्यंत कडक तपासणी होत आहे. काही दुर्गम भागातील धार्मिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली आहे. येथील जवानांवर हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

(सविस्तर बातमी)

=====================

- भाजप खासदारांचा 'क्‍लास' सुरू

त्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा-राज्यसभा खासदारांसाठी असलेल्या 'अभ्यास वर्गा'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी झाले.

(सविस्तर बातमी)

=====================

- राज ठाकरे, अजित पवार भ्रमीष्ट झालेले नेते

ईव्हीएमवर गैरविश्वास दाखवणे म्हणजे लोकशाहीची प्रतारणा केल्यासारखे आहे. राज ठाकरे, अजित पवार यांच्यासारखे काही भ्रमीष्ट झालेले नेते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.

(सविस्तर बातमी)

=====================

- जे कधी घराबाहेर पडले नाहीत, ते आता कोलकत्याला जाऊ लागले

जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकत्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत.

(सविस्तर बातमी)

=====================

- WhatsApp चे नवे फिचर लाँच

WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे.

(सविस्तर बातमी)

=====================

- पावसात अडकलेल्यांसाठी पालिकेने सुरू केले 'रिलीफ कॅम्प'

सीएसएमटी, दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पालिकेने 'रिलीफ कॅम्प' सुरू केले आहेत.

(सविस्तर बातमी)

=====================

- भारताविरुद्धच्या मालिकेतून विंडीजच्या स्फोटक खेळाडूची माघार

भारताविरुद्धच्या पहिला ट्वेन्टी-20 सामना काही तासांवर आलेला असताना वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा सर्वाधिक स्फोटक फलंदाज असा लौकिक असलेल्या आंद्रे रसेलने ट्वेन्टी-20 मालिकेतून स्वतःहून माघार घेतली आहे.

(सविस्तर बातमी)

=====================

- Breastfeeding Week : अभिनेत्री समीरा रेड्डीने शेअर केला व्हिडिओ

जगभर साजरा करण्यात येत असलेल्या Breastfeeding Week निमित्त बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने आई आणि मुलाच्या नात्याबद्दल सांगणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

(सविस्तर बातमी)

=====================


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 3rd August