गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा... सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल... पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद... यांसारख्या देश-विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- तोंडी तलाक, कलम 370 आणि आता....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तोंडी तलाक आता काश्मीरमधील 370 कलम ही हटविण्याच्या निर्णयानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते तिसऱ्या निर्णयाकडे.

(सविस्तर बातमी)

- कलम 370 आहे तरी काय?

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. अनेक दिवसांनी कलम ३७० चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. कलम ३७० मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, याचा आढावा.

(सविस्तर बातमी)

- ...तर जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा : अमित शहा

मोदी सरकारवर विश्वास ठेवा. पाच वर्षात काश्मीरला देशातील विकसित राज्य बनवून दाखवू. परिस्थिती सामान्य झाली आणि योग्य वेळ आली की, जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल करु, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत आज (सोमवार) सांगितले.

(सविस्तर बातमी)

- संजय राऊत कलम 370वर बोलले; अमित शहांनी अभिमानाने बाक वाजवला

कलम 370  हटवण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राज्यसभेत ऐतिहासिक विधेयक मांडलं. या विधेयकाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत खंबीर पाठिंबा दिला.

(सविस्तर बातमी)

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरही 'कलम 370'च्या विरोधात होते; पण...

कलम 370 हे गेली 70-72 वर्षं देशाच्या राजकारणात, समाजकारणात चर्चेचा, वादाचा विषय ठरलं आहे.  घटनाकार बाबासाहेब आंबेडकरही या कलमाच्या विरोधात होते. या कलमावर अनेक निवडणुकाही लढवल्या गेल्या. अगदी ताज्या 2019च्या लोकसभा निवडणुकीतही 'कलम 370' हटवण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं.

(सविस्तर बातमी)

- सोने पुन्हा चकाकले; 37 हजारांकडे वाटचाल

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा भडका उडण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढल्याने भावात आज वाढ झाली. अमेरिका-चीनमधील व्यापारी तणाव वाढल्यामुळे सोन्याचा भाव आज मे 2013 नंतरच्या उच्चांकी पातळीवर पोचला. स्थानिक सराफांकडूनही सोन्याला मागणी वाढल्याचाही परिणाम भावावर झाला.

(सविस्तर बातमी)

- पुण्यातील प्रवाशांनो, पुरामुळे आज 'हे' 7 पूल बंद

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणारे चार ते पाच प्रमुख पुल सुरक्षिततेच्यादृष्टीने बंद करण्यात आले.

(सविस्तर बातमी)

- सरस प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचे आक्रमण सुखावणारे : गोपीचंद

चिराग-सात्विकचा उंचावत असलेला आत्मविश्‍वास तसेच त्यांनी त्यांच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांचा न डगमगता केलेला सामना, त्यांच्याविरुद्धचे आक्रमण जास्त सुखावणारे आहे, असे मत भारताचे राष्ट्रीय मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

(सविस्तर बातमी)

- Bigg Boss : टफ कंटेंडर रूपाली भोसले घराबाहेर!

बिग बॉस मराठी 2 विकेंडचा डावमध्ये अभिनेत्री रूपाली भोसले घराबाहेर पडली. बाहेर पडताना रुपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आला. तिला एका सदस्याला वाचवायची पॉवर मिळाली येत तिने हीनाला वाचवले.

(सविस्तर बातमी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 5th August