आता 'आधार' नोंदणी टपाल कार्यालयातूनही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र आणि गोव्यातील नागरिक 2018 पासून 'आधार'ची नोंदणी टपाल कार्यालयातूनही करू शकणार आहेत. यासाठी 1200 टपाल कार्यालयांमध्ये आधार नोंदणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान खरेदी केली गेली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य टपाल मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी वृत्तसंस्थेला दिली.

सध्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डची नोंदणी गरजेची आहे. आधारकार्ड नसलेल्या नागरिकांना या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या सुविधेअंतर्गत आधारकार्ड नसलेल्यांना युनिक आयडेंटिटी क्रमांक दिला जाणार आहे. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे. अशा नागरिकांचे त्यांच्याकडील आधार अद्ययावत केले जाणार आहे. यासाठी 2216 पैकी 1293 टपाल खात्यांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे.

टपाल खात्याने जून महिन्यापासून आधार अद्यावत करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबत अगरवाल म्हणाले, "जून महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु केल्यानंतर आम्ही ई-खरेदीसाठी लागणाऱ्या आवश्यक तंत्रज्ञान आणि साधनसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 4000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. टपाल कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांसह आधारची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे'', अशी माहिती अगरवाल यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com