सकारात्मक बदलांसाठी पॅलेडियम इंडियाची स्थापना 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

"पॅलेडियम' आणि "एपी ग्लोबाले' यांनी भारतात सकारात्मक सामाजिक आणि आर्थिक बदल घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या विकासदृष्टीच्या माध्यमातून हे काम मोठ्या पातळीवर करतील. 

"पॅलेडियम ग्रुप' आणि "एपी ग्लोबाले' एकत्रितपणे शोधणार नवे मार्ग 

मुंबई- "पॅलेडियम' आणि "एपी ग्लोबाले' यांनी भारतात सकारात्मक सामाजिक आणि आर्थिक बदल घडविण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्या त्यांच्या विकासदृष्टीच्या माध्यमातून हे काम मोठ्या पातळीवर करतील. 
या दोन्ही कंपन्या एकत्र आल्याने त्यांचे स्थानिक ज्ञान आणि "नेटवर्क'चा तसेच, विकासातील नावीन्यासाठी त्यांची कटिबद्धता हे घटकही एकत्र आले आहेत. सामाजिक आणि आर्थिक मूल्यांच्या निर्माणासाठी सकारात्मक बदल करण्यावर पॅलेडियमचा प्रमुख भर राहिला आहे. स्थिर स्वरूपाचे सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कंपन्या, सरकारे, फाउंडेशन, गुंतवणूकदार, समुदाय आणि सामाजिक संस्था यांच्यासोबत पॅलेडियम धोरण आखणी आणि उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी काम करीत आहे. भारत तसेच, जगभरातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून दोन्ही कंपन्या अनेक वर्षे सकारात्मक बदल घडविण्याचे काम करीत आहेत. सकारात्मक बदलांसाठी नवे मार्ग शोधण्यासाठी पॅलेडियम आणि एपी ग्लोबाले सक्रियपणे गुंतवणूक करीत आहे. विकासाच्या पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. 

"पॅलेडियम'ने "एपी ग्लोबाले'शी भागीदारी केल्याने "डीसीएफ ऍडव्हायजरी सर्व्हिसेस'च्या सर्व क्षमता वापरात आणता येणार आहेत. अतिशय दुर्गम भागातही नागरिकांपर्यंत पोचून त्यांना कृतिशील करण्याचे काम "डीसीएफ'ने केले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरे, राज्य सरकार तसेच, कंपन्यांसोबतच्या प्रकल्पांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामावून घेण्याचे काम "डीसीएफ'ने केले आहे. 
पॅलेडियमच्या संचालक बार्बरा स्टॅन्कोव्हिकोवा म्हणाल्या, ""पॅलेडियम आणि एपी ग्लोबाले हे दोन्ही भारतात एकमेकांच्या साथीने काम करणार आहेत, याचा मला आनंद आहे. पॅलेडियमने देशात याआधीच एपी ग्लोबालेच्या साथीने अनेक विकास प्रकल्प राबविले आहे. आम्ही मिळून सकारात्मक बदल खऱ्या अर्थाने आणखी वाढवू शकू.'' 
पॅलेडियम इंडिया, हा संयुक्त प्रकल्प देशभरातील समुदायांच्या गरजा ओळखून त्यांना शाश्‍वत पर्याय शोधून देणार आहे. चांगले काम करीत असतानाच कंपन्यांचा नफा वाढविण्यासाठी पॅलेडियम इंडिया मदत करणार आहे. याचाच अर्थ सन्मानासोबत गुंतवणुकीवरील परताव्याची संधी कंपन्यांना मिळेल. 

सकारात्मक बदलांसाठीच्या नव्या मार्गांवर पॅलेडियम आणि एपी ग्लोबाले गुंतवणूक करणार आहेत. यामध्ये पारंपरिक विकास पद्धतीपेक्षा वेगळा विचार असेल. भारतात दोन्ही कंपन्या हे काम एकत्रितरीत्या करतील. 

समान विचारधारा आणि कार्यक्रम असलेल्या दोन कंपन्यांचे हे एकत्र येणे आहे. दोन्ही कंपन्या एकत्र येऊन भागधारकांसाठी एक मूल्याधारित व्यवस्था तयार करतील आणि लोकांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी काम करतील. चांगले काम करून मोठे होण्याची भारतात हीच योग्य वेळ आहे. 
- एपी ग्लोबालेचे अध्यक्ष 

"डेव्हलपमेंट इम्पॅक्‍ट बॉंड' 
"पॅलेडियम'ने नुकतीच जगातील पहिल्या आरोग्यधारित "डेव्हलपमेंट इम्पॅक्‍ट बॉंड'ची कल्पना आणली आहे. आता याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राजस्थानमधील माता आणि बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी याचा वापर होईल. "पॅलेडियम'ला भारतातील दहा राज्यांमध्ये आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा मागील काही दशकांचा अनुभव आहे. "पॅलेडियम'च्या जागतिक अनुभवाचा आरोग्य, आर्थिक विकास, प्रशासन आणि धोरण आखणी तसेच, भारतात सेवा पुरवठा या क्षेत्रात पॅलेडियम इंडियाला मोठा फायदा होईल. 

सामाजिक स्थित्यंतर 
डीसीएफ ऍडव्हायजरी सर्व्हिसेस शहरे आणि राज्याचे स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी बोर्डरुमपासून तळागाळातील वर्गाला सामावून घेत आहे. वेगवान आणि परिणामकारक कार्यक्रमांच्या माध्यमातून तीन ते पाच वर्षांच्या मुदतीत सामाजिक आणि आर्थिक बदल घडविणारे कार्यक्रम राबवित आहे. याचवेळी हे बदल दीर्घकाळ राहावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या "वॉटर फॉर ऑल इनिशिएटिव्ह' या कार्यक्रमासाठी डिलीव्हरींग चेंज फाउंडेशनने डीसीएफ ऍडव्हायजरी सर्व्हिसेस आणि परफॉर्मन्स मॅनेजमेंट ऍण्ड डिलीव्हरी युनिट (पेमांडू) यांची नियुक्ती केली होती. वॉटर फॉर ऑल इनिशिएटिव्हच्या 32 पैकी 14 प्रकल्पांचा समावेश महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जलयुक्त शिवार अभियानात समावेश केला होता. 

Web Title: marathi news abhijeet pawar Palladium Summit india