फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणा: अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई - कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. या निकालानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

सर्व यंत्रणांचे आभार मानतो- धनंजय मुंडे
कोपर्डीच्या निकालासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व यंत्रणाचे मी आभार मानतो. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या इतर खटल्यांमध्ये ही जलदगतीने न्याय व्हावा यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत. अशा शिक्षेमुळे गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन या पुढे अशा घटनांना पायबंद बसेल. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. राज्याचे प्रलंबित महिला सुरक्षा धोरण तातडीने जाहीर करावे. हा निकाल गुन्हेगारांना इशारा देणारा, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा आहे. कोपर्डी प्रकरणातील पीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपीना फाशीच्या शिक्षेचा निकाल पिडीतेला,तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा,समाधानकारक आहे. हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेंव्हा तिन्ही आरोपी फाशीवर लटकतील तेंव्हाच पुर्ण न्याय मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com