मंत्री स्वत:चं डोकं वापरतात का?; अजित पवार पुन्हा भडकले

विजय गायकवाड
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : सत्ताधारी मंत्री अधिकाऱ्यांडून ब्रिफींग घेऊन सभागृहात उत्तर देतात, असे भाजपा आमदार  योगेश सागर यांनी विधानसभेत सांगितले. या विधानाला जोरदार आक्षेप घेत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवारांनी 'मंत्री स्वत:चे डोकं वापरतात की फक्त अधिकाऱ्यांचे ब्रिफींग वाचून दाखवतात हे स्पष्ट करा, असा सवाल उपस्थित केला.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून अजित पवार सरकार लक्ष करण्याची संधी सोडत नाहीत. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेसाठी मंत्री उपस्थित नसल्याने  'मंत्री काय झोपा काढताहेत का? असे दादा कडाडले होते.

गुरुवारी सकाळी विधानसभेतील विशेष बैठकीत फेरीवाले आणि दूषित भाजीपाला विक्रेत्यांसंबधी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेचे उत्तर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील उत्तर देत होते. उत्तरावर समाधान न झाल्याने भाजप आमदार योगेश सागर यांनी मंत्री मनपा अधिकाऱ्यांचे ब्रिफींग घेऊन दिशाभूल करणारी उत्तरे  देत असल्याचे सांगितले.

अजित पवारांनी या वक्तव्याला  जोरदार आक्षेप घेतला. अजित पवार म्हणाले, ''आम्हीही सरकारमध्ये मंत्री होतो. अधिकारी ब्रिफींग देतात. मंत्री या माहितीमधे स्वत:चे डोकं वापरुन सभागृहात उत्तर देतात, असा आमचा अनुभव आहे. आता सत्ताधारी आमदारच मंत्र्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करत असतील तर गंभीर बाब आहे.'' 'सत्ताधारी मंत्री खरंच स्वतःचं डोकं वापरतात का', हे राज्यातील जनतेला स्पष्ट करण्याची मागणी अजित पवारांनी केली.

Web Title: marathi news Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha