मंत्री झोपा काढतात काय? - अजित पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - सभागृहात पहिल्या रांगेतील बाकावर बसणाऱ्या 12 पैकी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत याची आम्हाला कल्पना आहे; परंतु बाकीचे मंत्री झोपा काढतात की काय? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. 

विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरवात झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाषणावेळी सभागृहात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री उपस्थित नव्हते. विखे यांनी भाषणाला सुरवात करण्यापूर्वी पवार यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. 

विरोधी पक्षनेत्यांचे भाषण सुरू असताना मुख्यमंत्री हजर राहतात. मात्र, मुख्यमंत्री आज दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री नसले तरी मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री किंवा अर्थमंत्री, संसदीय कामकाजमंत्री, कृषिमंत्री यांपैकी एकही जण हजर नाही. मंत्री झोपा काढतात काय? असा प्रश्न पवार यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात सरकारचा दम निघालेला दिसतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पवारांचा संताप पाहून संसदीय कामकाजमंत्री विनोद तावडे सभागृहात आले. मंत्र्यांना उपस्थित राहण्याबाबत निरोप पाठवतो, तोपर्यंत विरोधी पक्षनेत्यांनी भाषण सुरू करावे, अशी विनंती तावडे यांनी केली. विखे भाषणाला उभे राहिल्यानंतर कॉंग्रेसच्या आमदारांनी मंत्री येईपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करावे, अशी विनंती केली. आमदारांनी गोंधळ घालायला सुरवात केल्यानंतर तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. 

Web Title: marathi news ajit pawar minister vidhansabha