महिलांना ‘अस्मिता’ स्वाभिमानी बनवेल   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई - महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. 

ग्रामविकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा प्रारंभ गुरुवारी मुंबई विद्यापीठातल्या दीक्षान्त सभागृहातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.  चित्रपट अभिनेते अक्षयकुमार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आदी या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, अस्मिता योजना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांतिकारी ठरावी, अशी ही योजना ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. अभिनेते अक्षयकुमार यांचा ‘पॅडमॅन’ चित्रपट ३१ मार्चपर्यंत सर्व शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. 

Web Title: marathi news Asmita Yojana women girl Sanitary pad maharashtra