औरंगाबादमध्ये माणुसकीचाच कचरा झाला: अजित पवार

सिद्धेश्वर डुकरे
गुरुवार, 15 मार्च 2018

अजित पवार म्हणाले माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते.
या ठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. या दोन ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे.

मुंबई : औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी मागणी विखे पाटील यांनी केली असून सभागृह चौथ्यांदा तहकूब करण्यात आले.

यावर बोलताना विखे पाटील औरंगाबाद कचरा प्रश्नी प्रशासनाने काय केले? जनतेवर पोलिस लाठीचार्ज करतात आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात बसून राहतात. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार का? कचराप्रश्न मिटवण्यासाठी अधिकारी परदेशात गेले त्यावर दीडशे कोटी खर्च झाला त्याची चौकशी करा.

यानंतर अजित पवार म्हणाले माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते.
या ठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. या दोन ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे.

सरकारला न्याय दयावा लागेल आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही हे पोलिस अधिकारी किती काम करतात याची चौकशी करा. काम करण्याऐवजी ते क्रिकेट खेळायला जातात त्यानंतर चार वाजता ऑफिसला जातात.मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांना जास्त सेक्युरिटी आहे. यावर मंत्री रणजित पाटील, कोर्टाचा निकाल आल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी उपस्थित होते. आज सभागृह संपण्याच्या आता निर्णय घेऊ. औरंगाबाद कचरा प्रश्नावर शिवसेनासह इतर आमदार आक्रमक झाले असून त्यांनी वेलमध्ये उतरून पोलिस आयुक्त रजेवर पाठवण्याची मागणी केली. पाटील पूढे असे म्हणाले, की शासन आपल्या स्थरावर चौकशी करील. पोलिस आयुक्त यांची ही चौकशी केली जाईल. स्थानिक गावकरी यांनी चार महिन्यांची मुदत दिली होती हे खरे आहे. त्या संदर्भात चौकशी करणार असून या कचरा प्रश्ननावर अभ्यास करण्यासाठी परदेशात अनुदान घेऊन गेले होते त्याची ही चौकशी केली जाईल.

Web Title: Marathi news Aurangabad news Ajit Pawar criticize Government on Aurangabad garbage issue