नाशिक महापालिकेची करवाढ भाजपचे नाकेनऊ, भंडारींचा काढता पाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नाशिक :  महापालिकेतर्फे भाडेमूल्यदरावर आधारित केलेल्या सहा पट करवाढीचा विषयाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नाकेनऊ आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शहरवासियांच्या रोषाबद्दल काय सांगाल? या प्रश्‍नावर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेतून हा विषय स्थानिक असल्याचे सांगत काढता पाय घेतला. तसेच यासंबंधाने स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उत्तर देतील असे श्री. भंडारी यांनी सांगूनही पत्रकारांच्या प्रश्‍नाला बगल दिली. काही जणांनी श्री. भंडारी यांच्यासमवेत जाणे पसंत केले. 

श्री. भंडारी हे निघून गेल्यावर महापौर रंजना भानसी आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप या दोघांनीही महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीशी सहमत नाही असे स्पष्ट करत या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती दिली.

महापौर म्हणाल्या, आयुक्तांची आम्ही भेट घेतल्यावर त्यांनी कर निश्‍चितीकरणाचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यावर धोरणात्मक निर्णयासाठी विषय महासभेवर आणावा अशी विनंती आयुक्तांना करण्यात आली होती. तसे न घडल्यास सरकारकडून कर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. 
 
परंपरा पाळायला हवी 
लोकप्रतिनिधी, महासभा, स्थायी समिती आणि प्रशासनाने एकत्र मिळून निर्णय घेतले आहेत. ही परंपरा आताही पाळायला हवी. करवाढीचा विषय महासभेवर ठेवला जावा. तसे न होता हा विषय राज्य सरकारकडे गेल्यास मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आम्ही कसल्याही परिस्थितीत शहरवासियांसमवेत राहणार आहोत, असेही

श्री. सानप यांनी सांगितले. श्री. भंडारी हे निघून गेल्यावर गटनेते संभाजी मोरुस्कर हे उत्तर देतील असे सूचित करत भाजपतर्फे वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न चालला होता. मात्र महापौर, शहराध्यक्ष हे उपस्थित असताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडायला हवी, असा पत्रकारांचा आग्रह राहिल्यावर जनतेच्या सोबत राहण्याचा निर्वाळा देत भाजपने पत्रकार परिषद पार पाडली. 

Web Title: marathi news bhandari press conference