याकूबप्रमाणे भिडे, एकबोटेंवर गुन्हा दाखल करा: प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

याकूब मेमन याला ज्याप्रमाणे शस्त्र पुरवण्यात आल्याने दोषी धरत शिक्षा सुनावली होती, त्याचप्रमाणे यांच्यावर ही गुन्हे दाखल करावा. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी कोणतेही वादग्रत विधान केले नाही. त्या कार्यक्रमाला मी होतो आणि माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील ही उपस्थित होते. सरकारचा हा खोडसाळपणा आहे. तपासानंतर हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोणी दिले हे स्पष्ट होईल.

मुंबई : कोरेगाव भीमा या कार्यक्रमात फक्त दलित संघटना सहभागी नव्हत्या, तर 250 विविध विचारांचे लोक सहभागी होते. मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर दाखल केलेले अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्यावेत. त्यांच्यावर मृत्यूला जबाबदार आणि दंगलीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. याकूब मेमन याला ज्याप्रमाणे शस्त्र पुरवण्यात आल्याने दोषी धरत शिक्षा सुनावली होती, त्याचप्रमाणे यांच्यावर ही गुन्हे दाखल करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, की जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी कोणतेही वादग्रत विधान केले नाही. त्या कार्यक्रमाला मी होतो आणि माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील ही उपस्थित होते. सरकारचा हा खोडसाळपणा आहे. तपासानंतर हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश कोणी दिले हे स्पष्ट होईल. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये राज्यातील अनेक संघटना सहभागी आहेत, सर्वांनी शांतता बाळगावी, जबरदस्ती करू नये असे मी आवाहन करतो. मुख्यमंत्र्यांना या घटनेमागे कोण आहे, याची माहिती आहे.

सणसवाडी हिंसाचार हाताळण्यास गृह विभागाने कसूर केली असून, पोलिसांनी या प्रकरणात अक्षम्य हेळसांड केल्याचा आरोप करत भारतीय बहुजन महासंघाने आज (बुधवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बंदचे पडसाद उमटत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको व विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. डाव्या आणि दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मराठा संघटनांनीही प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Marathi news Bhima Koregaon Prakash Ambedkar statement