भुजबळांच्या इच्छेनुसार होणार पुढील उपचार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांनी भुजबळांच्या इच्छेनुसार पुढील उपचार होतील, असे स्पष्टीकरण दिले. 

उच्च न्यायालयाची उद्या (ता. 3)पासून उन्हाळ्याची सुटी सुरू होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी (ता. 4) भुजबळांचा जामीन अर्ज मंजूर झाला. त्यामुळे समर्थकांप्रमाणेच कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. न्यायालयाची सुटी सुरू होत असली तरीही प्रशासकीय कामकाज चालू राहणार असल्याने शनिवारी (ता. 5) अथवा सोमवारी (ता. 6) न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळेल. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत ऑर्थर रोडच्या तुरुंगात न्यायालयाच्या आदेशाची प्रत जमा केली जाईल. मग रुग्णालयातून भुजबळांना तुरुंगात आणले जाईल. तुरुंगातून त्यांची सुटका केली जाईल, असेही वकिलांनी सांगितले. 

प्रकृतीचा प्राधान्याने व्हावा विचार 
स्वादुपिंडाच्या त्रासावरील उपचारासाठी भुजबळांना 3 मार्चला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 15 मार्चला त्यांना के.ई.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. भुजबळांच्या प्रकृतीतील बिघाडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी नोंदविली होती. पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या नाशिकमध्ये श्री. पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप सभेत भुजबळांच्या प्रकृतीप्रमाणेच त्यांच्याविषयी सरकार राजकीय सूडबुद्धीने वागत असल्याचे कोरडे पक्षाच्या नेत्यांनी ओढले होते. 

Web Title: marathi news bhujbal treatment