तारापूर औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट

नीरज राऊत
शुक्रवार, 9 मार्च 2018

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील इ- झोन मध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला असून त्याचे हादरे तब्बल 30-35 किलोमीटर पर्यंत जाणवले.

रात्री 1130 च्या सुमारास पहिला स्फोट झाला तेव्हा संपूर्ण पट्ट्यातील घरांच्या भिंती, दरवाजे, पत्रे हादरले. प्रथम नागरिकांना भूकंप झाल्याचा भास झाला आणि लोक घराबाहेर आले.

त्यानंतर 5-6 भीषण स्फोट सुरू राहिले. या आगीच्या ज्वाला खूप उंच असल्याने लांबून दिसून येत होत्या. या स्फोटानंतर औधिगिक वसाहतीमधील विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. 

या कंपनीमध्ये रिऍक्टर मध्ये स्फोट झाला व नंतर बॉयलर आणि सोलव्हेन्ट टाकीचे स्फोट झाल्याचे समजते. अपघातग्रस्त कंपनी आणि नेमकी झालेली जीवित हानी चा अंदाज अजूनन समजू शकले नाहीत.

अपघात स्थळी महसूल व पोलीस पथकांना तातडीने पाठवण्यात आल्याचे पालघर चे जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी 'सकाळ'ला सांगितले

संपूर्ण परिसरात नागरिकांना येण्यास माजजव केल्याने कंपनी चे नाव व तपशील समजू शकलेला नाही.

Web Title: Marathi news blast at Tarapur MIDC company