"बीएनएचएस'च्या डिजिटायझेशन प्रकल्पाला सरकारची मदत - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - पशुपक्ष्यांच्या विभिन्न प्रजातींचा निसर्गातील वातावरणावर तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) करत असलेले कार्य मोलाचे आहे. सोसायटीच्या डिजिटायझेशन प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत करण्यास राज्य शासनास आनंद होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. तसेच बीएनएचएसच्या हॉर्निमन सर्कल येथील इमारतीचा भाडेपट्टा करार लवकरात लवकर वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

बीएनएचएसच्या हॉर्निमन सर्कल येथील कार्यालयास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाची व स्थलांतराची माहिती इंडियन बर्ड मायग्रेशन ऍटलासचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तुहीन कट्टी व डॉ. भालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, निर्सगातील पशुपक्ष्यांच्या प्रजाती वाचविण्यासाठी बीएनएचएसचे कार्य संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय मोलाचे आहे. अनेकदा कळत-नकळतपणे मानवाकडून पक्ष्यांच्या उत्पत्तीस्थानाला धोका पोचत असतो. त्यामुळे होणाऱ्या निसर्गातील बदलाचे परिणाम मानवाच्या जीवनावर पडताना दिसते. निर्सगात आवश्‍यक असलेल्या पशुपक्ष्यांच्या वास्तव्याचे महत्त्व बीएनएचएससारख्या संस्थांमुळे कळत असते. 

Web Title: marathi news BNHS digitization project maharashtra CM devendra fadnavis