कॅप्टन अमोलच्या पंखांना "मॅग्नेटिक महाराष्ट्रा'चे बळ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

मुंबई - कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी विमानांच्या कारखान्यासाठी राज्य सरकारने "एमआयडीसी'मार्फत पालघरमध्ये जागा देण्याचे ठरवले आहे. "मॅग्नेटिक महाराष्ट्र' या जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला. या करारामुळे यादव यांचे स्वदेशी विमान निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. 

मुंबईतील "मेक इन इंडिया वीक'मध्ये यादव यांचे विमान दिमाखात दाखवण्यात आले होते. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंत हा विषय पोचवला होता. ""राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करून जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करून त्यामध्ये पहिले विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे,'' असे यादव एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. भारतातील हा पहिलाच स्वदेशी विमान तयार करण्याचा कारखाना आहे. 

दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने यादव यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन करून घेतले होते. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.

Web Title: marathi news Captain Amol yadav MIDC maharashtra