भुजबळांची अजून किती अवहेलना करणार?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत नाजूक असताना त्यांना वैद्यकीय सुविधांसाठी रांगेत उभे करून जनरल वॉर्डमध्ये ठेवले जात आहे. वैद्यकीय सुविधांअभावी त्यांच्या तब्येतीचे बारा वाजले आहेत. त्यांचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. माजी मंत्री व विद्यमान विधानसभा सदस्याची किती अवहेलना करणार, असा परखड सवाल ‘राष्ट्रवादी’चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केला.

भुजबळांवरील गैरव्यवहार अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यांचे हिमोग्लोबीन आठवर आले आहे. तरी त्यांना रांगेत उभे राहून कागदपत्रे दाखवून तपासण्या कराव्या लागतात. जनरल वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. भुजबळ आरोपी आहेत; गुन्हेगार नाहीत. त्यामुळे माणुसकी दाखवून वैद्यकीय सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो. भुजबळांना आरोग्य सुविधा वेळेत पुरविण्याबाबत तुरुंग प्रशासनाला कळवण्यात येईल, असे सांगितले.

भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्याच्या मुद्द्यावरून आज सलग दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. अखेर गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगत या विषयावर पडदा टाकला. भुजबळ यांच्या उपचाराविषयी पंकज भुजबळ आणि तुरुंग अधीक्षकांशी चर्चा केली असल्याची माहिती सभागृहाला दिली.

Web Title: marathi news Chhagan Bhujbal jitendra awhad maharashtra