शेतकऱ्यांना आरटीजीएसने पैसे वितरण कराः सुभाष देशमुख 

विनोद बेदरकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

नाशिक: बाजार समित्यातील कृषी माल खरेदी पोटी व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देतात ते वटत नाहीत. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांचे धनादेश वटणार नाहीत. त्यांना व्यापाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे. बाजार समित्यांमधील व्यवहाराचे धनादेशाऐवजी आरटीजीएसने शेतकऱ्यांना पैसे वितरित व्हावेत. असे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. 

नाशिक: बाजार समित्यातील कृषी माल खरेदी पोटी व्यापारी शेतकऱ्यांना धनादेश देतात ते वटत नाहीत. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांचे धनादेश वटणार नाहीत. त्यांना व्यापाऱ्यांना काळ्या यादीत टाकावे. बाजार समित्यांमधील व्यवहाराचे धनादेशाऐवजी आरटीजीएसने शेतकऱ्यांना पैसे वितरित व्हावेत. असे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. 

नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयात श्री देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, डॉ.राहूल आहेर, प्रा.डॉ. देवयानी फरांदे, 
सिमा हिरे, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष केदा आहेर, सहकार उपनिबंधक निळकंठ करे, जिल्हा बॅकेचे कार्यकारी आधिकारी राजेंद्र बकाल आदी उपस्थित होते. बैठकीत श्री बकाल यांनी जिल्हा बॅकेसाठी 125 कोटीची मागणी केली. 

श्री देशमुख म्हणाले की, बाजार समित्यांचे जिल्ह्यात चांगले जाळे आहे. पण त्यात नाविण्यपूर्ण संस्थाचा वाणवा असल्याने प्रत्येक तालुक्‍यात सहाय्यक निबंधकांनी एक तरी संस्था स्थापावी. बाजार समित्यांच्या बैठकांना सहाय्यक निबंधक दांड्या मारतात. त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावित खुलासा मागवावा. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी धनादेश देतात. पण बऱ्याचदा धनादेश वटत नाही. त्याचा शेतकऱ्यांना भुर्दंड कशासाठी ? त्यामुळे धनादेशाऐवजी आरटीजीएसने पैसे वितरणाची प्रथा सुरु करावी. 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर 
करता येतील. असे सांगितले. 

पतसंस्थासाठी स्थैर्य निधी 
पतसंस्थांतील ठेवीदारांच्या हित संरक्षणासाठी व नियंत्रणासाठी शासनाने नियामक मंडळ स्थापनेचा निर्णय घेतला आहे. तसेच पतसंस्थासाठी स्थैर्य निधी निर्माण केला आहे. असे सांगून श्री देशमुख यांनी मातेरेवाडी (ता.दिंडोरी) आणि कोंढार (ता.नांदगाव) येथील सहकारी संस्थांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्यात पोहोचविली जाईल. 
असे सांगितले. तर जिल्हा बॅकेच्या मदतीचा हा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीपुढे ठेवला जाईल. त्यानंतर मदतीवर निर्णय होईल. असे स्पष्ट करतांनाच, जून्या बदलून न मिळालेल्या नोटांविषयी मात्र कानावर हात ठेवले. 

सहकार मंत्री म्हणाले 
जुन्या नोटाचे, रिर्झव बॅक जिल्हा बॅकांनाच माहीती 
सहाय्यक निंबधकांनी सहकारी संस्था स्थापाव्यात 
बाजार समिती बैठकांना दांडी मारणाऱ्या निबंधकाच्या चौकशा 
बेकायदेशीर सावकारांकडून लूटीची माहीती घ्यावी 

Web Title: Marathi news co-operative minister