राज्यात जलसाठा गेल्या वर्षीपेक्षा तीन टक्‍क्‍यांनी अधिक 

residentional photo
residentional photo

नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा साडेचार आणि मराठवाड्यात दीड टक्‍क्‍यांनी कमी असल्याचे दिसते. 

   राज्यात नाशिक आणि मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने या दोन्ही विभागांतील जलसाठ्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. नाशिक विभागात आतापर्यंत 82.4, औरंगाबाद विभागात 87.3 टक्के पाऊस झाला. या दोन विभागांचा अपवाद वगळता पुणे विभागात 99.7, कोकण- 128.7, नागपूर- 105.5, अमरावतीत 104.8 टक्के पावसाची नोंद झाली.

विभागनिहाय मोठे, मध्यम, लघुप्रकल्पांची संख्या पुढीलप्रमाणे अनुक्रमे असून, (कंसात विभागातील सर्व धरणांतील उपयुक्त जलसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये दर्शवतो) ः अमरावती-10-25-410 (1 हजार 413), कोकण-11-7-158 (2 हजार 999), नागपूर-17-42-326 (1 हजार 744) , नाशिक-23-53-485 (2 हजार 708), पुणे-35-50-640 (10 हजार 166), मराठवाडा-44-81-838 (एक हजार 501). 
खरीप पेरण्यांत सात टक्‍क्‍यांनी पिछाडी 

राज्यात गेल्या आठवड्यापर्यंत गेल्या वर्षीच्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत खरिपाच्या पेरण्या सात टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत. त्यात तृणधान्याच्या 21, कडधान्यातील 14, कापसातील चार टक्के पिछाडीचा समावेश आहे. राज्यात खरिपाच्या 78 टक्के पेरण्या झाल्या आहेत. तेलबियांखालील क्षेत्र 95 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते दोन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. चिंताजनक परिस्थिती म्हणजे, भाताची लागवड 33, ज्वारीची पेरणी 39, बाजरीची 48.37, मक्‍याची 90 टक्के पेरणी झाली असून, ती गेल्या वर्षीच्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत 21 टक्‍क्‍यांनी कमी आहे. भाताची लागवड 19, ज्वारीची पेरणी 25, बाजरीची 31, मक्‍याची 12 टक्‍क्‍यांनी कमी राहिली आहे. कोकण विभागात 33.60, नाशिकमध्ये 79, पुण्यात 57.67, कोल्हापूरमध्ये 62, औरंगाबादमध्ये 71.41, लातूरमध्ये 81.91, अमरावतीमध्ये 88, नागपूरमध्ये 60 टक्के क्षेत्रावर आतापर्यंत पेरण्या उरकल्या आहेत. 

राज्यातील धरणसाठा 
(आकडे टक्केवारीमध्ये) 

विभागाचे नाव मोठे, मध्यम, लघुप्रकल्प 
आजचा जलसाठा गेल्या वर्षी जलसाठा 
अमरावती 33.70 21.11 
कोकण 85.43 84.70 
नागपूर 37.09 19.17 
नाशिक 45.72 50.33 
पुणे 66.78 64.84 
मराठवाडा 20.37 21.97 

जिल्हानिहाय पर्जन्याची टक्केवारी 
- 50 ते 75 टक्के ः नंदूरबार, सोलापूर, औरंगाबाद 
- 75 ते 100 टक्के ः नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, जालना, बीड, बुलडाणा 
- 100 टक्‍क्‍यांहून अधिक ः ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com