वडलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या कन्या

अभिजीत सोनावणे
Friday, 11 October 2019

विधानसभा निवडणुकीत कन्या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.

महाराष्ट्रात बिवाडणुका लागल्यात. यंदाची निवडणूक हि सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशातच वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या काही कन्यांची माहिती आम्ही देणार आहोत. विधानसभा निवडणुकीत या मोठ्या ताकतीनं उतरल्यात. आणि आपल्या वडलांचा वारसा जपण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.

पंकजा मुंडे

या लिस्ट मध्ये प्रामुख्यानं नाव पुढे येतं ते पंकजा मुंडेंचं. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा पुढे नेताना, चुलत बंधू धनंजय मुंडेंना सर्वच क्षेत्रांत मात दिलीय. यंदाही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच सामना परळीत होतोय.

प्रणिती शिंदे

काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या इतकीच प्रणिती शिंदेंची ओळख नाही. दिलीप माने या एकेकाळच्या काँग्रेस आमदाराशी लढत देण्याची वेळ यंदा त्यांच्यावर आलीय. सोलापुरात त्यांच्याविरुद्ध माजी आमदार नरसय्या आडमही आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत अटीतटीची ठरणार आहे.

 

रश्मी बागल

करमाळ्याचे माजी आमदार दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेते विद्यमान आमदार नारायण पाटलांनी बंडखोरी केलीय तर राष्ट्रवादीनं अपक्ष संजय शिंदेंना पाठिंबा दिल्यानं त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे.

 

रोहिणी खडसे

भाजपनेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिलीय..तिकीट नाकारल्यानं नाराज झालेले एकनाथ खडसेंनी आता स्वतःला रोहिणी खडसेंच्या प्रचारात झोकून दिलंय.

 

वर्षा गायकवाड

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड पुन्हा एकदा धारावीतून निवडणूक रिंगणात आहेत..दरवेळी त्यांनी बाजी मारलीय..यंदा त्यांच्यासमोर शिवसेनेचे आशिष मोरे आहेत.

 

नमिता मुंदडा

माजी मंत्री विमल मुंदडा यांचा वारसा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सूनबाई नमिता मुंदडा चालवत आहेत..राष्ट्रवादीनं केजमधून उमेदवारी दिली असताना, त्यांनी भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीलाच  आव्हान दिलंय..आता त्यांना राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठेंच मुकाबला करावा लागणाराय.

 

पुढची पिढी आज राजकारणात समर्थपणे उतरलीय. मात्र, त्यांना आपल्या आधीच्या पिढीप्रमाणे राजकारण जमतंय का, हे तर निकालाच्या दिवशीच कळेल.

Web Title : marathi news daughters who are handling political Inheritance of their fathers

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news daughters who are handling political Inheritance of their fathers