सिंकदरचे झाले ते तुमचे होऊ नये - धनंजय मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - "याद रख सिंकदर के हौसले तो आली थे... जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे...' अशा शब्दांत भाजप सरकारला सुनावतानाच अशी अवस्था सरकारची झाली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना केला. 

मुंबई - "याद रख सिंकदर के हौसले तो आली थे... जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे...' अशा शब्दांत भाजप सरकारला सुनावतानाच अशी अवस्था सरकारची झाली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना केला. 

हा प्रसिद्ध शेर मुंडे यांनी सभागृहात ऐकविला. सिंकदर जग जिंकत गेला. भाजपही एक एक राज्य जिंकत जात आहे. पण सिंकदरने एक चूक केली. जिंकलेले राज्य सांभाळण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही. त्याप्रमाणेच भाजप जिंकत तर आहे, पण राज्य कसे चालवावे? हे त्यांना कळत नाही. म्हणूनच जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचे होऊ नये, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. आजकाल सरकारमधील लोकांना राग खूप यायला लागला आहे. साडेतीन वर्षे झाली आहेत. राग वाढणार हे स्वाभाविकच आहे. कारण विरोधी पक्ष एकवटतोय म्हणून तो राग आहे, असा टोला मुंडे यांनी सरकारला लगावला. 

राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये हुतात्मा जवानांचा मुद्दा मांडण्यात आला. सीमेवर हुतात्मा झालेल्या जवानांसाठी स्व. बाळासाहेबांच्या नावाने 'शहीद सन्मान योजना' काढली. एका बाजूला सत्ता पक्षाचे सदस्य सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात, ज्यामुळे सभागृह बंद पडते याच्यासारखे दुर्दैव नाही. कर्नाटक सीमेचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सीमेवरील मराठी बांधव अखंड महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहे. मात्र राज्यातील एका मंत्र्याने कर्नाटकात जाऊन कर्नाटक गीत गायले. मग राज्यपालांच्या अभिभाषणात त्या मराठी बांधवांचे प्रश्न का मांडता, असा संतप्त सवालही मुंडे यांनी या वेळी केला. 

मुंडे म्हणाले.... 
- पावलोपावली महापुरुषांचा अपमान सरकार करत आहे 
- राज्यपाल हे मनाने बोलत नाहीत, तर सरकारने त्यांना बोलायला लावले आहे 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक अजून झाले नाही. 
- महात्मा फुले यांच्या विचाराने हे सरकार चालते, मग राज्यातील शाळा बंद करत का करत आहात? 
- सरकार महापुरुषांच्या विचाराने नाही, तर स्वत:च्या विचाराने चालत आहे. 

Web Title: marathi news Dhananjay Munde maharashtra politics