मंत्री मुद्द्यांऐवजी गुद्यांवर येतात - धनंजय मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - भाजपने संसदीय परंपरेच्या सर्व मर्यादा पार केल्या असून, विधान परिषदेतील सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे आज सदस्यांच्या अंगावर धावून गेले. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले सरकारचे ज्येष्ठ मंत्री सभागृहात मुद्द्यांऐवजी गुद्यांवर येत असतील, तर राज्यात लोकशाही नाही तर ठोकशाही आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मुंडे या वेळी म्हणाले की, आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासंदर्भातील ठराव शिवसेनेने मांडल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाच्या मर्यादा भंग करणारी वर्तणूक केली. सभागृह चालवण्याची जबादारी विरोधी पक्षांसह सर्वांची असली, तरी सत्तारूढ पक्षाची अधिक असते, याचे भान सभागृहनेत्यांना राहिले नाही. ते सदस्यांच्या अंगावर धावून गेले, मुद्द्यांवरून गुद्यांवर आले. सभागृह नेत्यांच्या त्या कृतीचा मी निषेध करत आहे. 

राज्यपालांच्या अभिभाषणातील फोलपणा उघड होऊ नये, त्यावरीच चर्चा टळावी, यासाठीच कदाचित हा डाव खेळला असावा, अशी शक्‍यताही मुंडे यांनी व्यक्त केली. विधानसभेतील कामकाजाशी आपला थेट संबंध नाही; परंतु त्या सभागृहात आपल्या आवाजाची नक्कल असलेल्या कथित ऑडिओ क्‍लिपचा उल्लेख करून गदारोळ करण्याचा प्रयत्न झाला. ती क्‍लिप बोगस असून ती बनवणाऱ्यांविरुद्ध आपण परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. क्‍लिप व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असेही मुंडे म्हणाले.

Web Title: marathi news dhanjay mundhe chandrakant patil