'मुख्यमंत्रिपद अन्‌ विकासाबाबत उत्तर महाराष्ट्रावर सतत अन्याय'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 मार्च 2018

मालेगाव (जि. नाशिक) - राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच केला आहे. आता विकासाबाबतही हीच परिस्थिती आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले. त्यामुळे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या कर्मभूमीत त्यांनी मुख्यमंत्रिपद हुकल्याची खंतच बोलून दाखल्याचे मानले जात आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त भायगाव रस्त्यावरील राजीव गांधी तंत्रशिक्षण संकुलाच्या प्रांगणात अभीष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळावा झाला. त्या वेळी खडसे बोलत होते. 

खडसे म्हणाले, की कर्मवीर भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब चौधरी, प्रतिभाताई पाटील, रोहिदास पाटील व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचले होते. मात्र सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक वेळी उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्राचे काय, असा सवाल करतानाच, आम्हाला रोजगार, उद्योग नको आहे का? मॅग्नेटिक महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक झाली. मात्र त्याचा उत्तर महाराष्ट्राला लाभ होणार नसेल तर आवाज उठवू. खानदेशातील हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून संघर्ष करावा, एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले. 

बाजार समितीचे सभापतिपद प्रसाद हिरे यांना शोभणारे नव्हते. त्यांची व त्यांच्या कामाची उंची मोठी आहे. राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हवी ही शिवसेनेची भूमिका आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी, पाण्यासाठी खडसे यांनी नेतृत्व करावे. आम्ही त्यांना साथ देऊ. 
- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री 

Web Title: marathi news eknath khadse north maharashtra bjp