माझी बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई केली - खडसे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - माझी बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केला. 

मुंबई - माझी बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई केली, असा सवाल भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केला. 

मी 25 ते 30 वर्षे सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र, मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची भ्रष्टाचारविरोधी पथक, "सीआयडी', लोकायुक्तमार्फत चौकशी केली. मात्र, त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. अशा पद्धतीचे बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का, असा सवाल खडसे यांनी करत कारवाईबाबत धोरण स्पष्ट करावे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत केले. 

दरम्यान, "विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्‍लिप जाहीर करून बेछूट आरोप करतात. लोकप्रतिनिधींना बदनाम करतात. अशांची चौकशी झाली पाहिजे,' असा मुद्दा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करत आरोप करणाऱ्यांची चौकशीची मागणी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतली. तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील, असे आश्वासन दिले. त्याबरोबर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्याचीही सूचना केली.

Web Title: marathi news eknath khadse vidhan sabha maharashtra