कोबीच्या मातीमोल बाजारभावामुळे उभे पिक कापुन फेकले,सरकारच्या धोरणाचा निषेध

दिपक अहिरे
शुक्रवार, 30 मार्च 2018

पिंपळगावं बसवंत : .द्राक्ष पिकाला मिळणारा बेभरवशाचा भावामुळे नगदी भाजीपाल्याचे पिक घेण्याचा निफाड तालुक्यातील शेतकरी प्रयत्न करतात.पण यातुन उत्त्पन्न तर सोडाच खर्च ही फिटत नसल्याने शेती व्यवसाय हातबट्टयाचा धंदा झाल्याचे अधोरेखित होत  आहे. पिंपळगावंच्या भगवान गुलाब मोरे या शेतकर्यांने अर्ध्या एकरावर कोबी पिक घेतले.पण दोन रूपये कंद असा बाजारभाव मिळू लागल्याने मोदी सरकारच्या शेती विरोधी धोरणावर संताप व्यक्त करीत उभे पिक कापुन फेकले.

पिंपळगावं बसवंत परिसर तसा द्राक्षाने बहरलेला व त्या पिकातुनच अार्थीक समृध्दी मिळविलेला परिसर.पण गत चारवर्षा पासुन अवकाळी पाऊस,गारपीट,व बेभरवशांचा बाजारभाव यामुळे द्राक्षपिकाला येथील शेतकरी पर्याय शोध घेऊ लागलेत.पिंपळगावंच्या रानमळा भागातील भगवान मोरे या अल्पभुधारक शेतकर्याकडे एका एकरावर द्राक्ष बाग अाहे.तर उर्वरीत अर्ध्या एकरावर जानेवारी महिन्यात बोर्डर वाणांचे कोबीच्या रोपाची लागवड केली.त्यासाठी पाच हजार रूपये बियाणे,तीन हजार रूपये खते,15 हजार रूपये अौषध फवारणी व पाच हजार रूपये मजुरी लागली.सुमारे 40 हजार रूपये खर्च करून त्यांनी हे पिक फुलविले.

मार्च अखेरीस हे पिक काढणीसाठी अाले.800 रूपये भाड्याचे वाहनाने कोबीचे 500 कंद अोझरच्या भाजीपाला मार्केट मध्ये विक्रीसाठी नेले.प्रति कंद 2 रूपये दराने व्यापार्यानी भाव पुकारला.त्यातुन हजार रूपये मिळाले.वाहन भाडे वजा जाता अवघे दोनशे रूपये शिल्लक राहीले.काढणीसाठी लागलेली मजुरी पाहता तीन महिने मेहनत घेऊन ही कोबी ने मोरे यांचे 40 हजार रूपयांला अार्थीक झळ बसली.
 
कोबीचे उभे पिक कापुन फेकले.
कोबीच्या हिरव्यागार कंदांनी शेत बहरलेले पण त्याला मिळणार भाव पाहुन मोरे यांचा संताप अनावर झाला.हातात विळा घेऊन कोबीचे उभेपिक छाटुन टाकले.मोठ्या कष्टाने फुलविलेल्या कोबीला मोरे यांनी जमीनदोस्त करून टाकतांना त्यांनी भाजप सरकारवर त्रागा व्यक्त केला.मोदी सरकारचे हेच का ते अच्छे दिन अशा शब्दांत त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.

द्राक्ष काढणी पुर्वी दोन पैसे हाती येतील या अपेक्षेने कोबीची लागवड केली.पण उत्तन्न तर नाही पण झालेले 40 हजार रूपयांचा खर्च ही वसुल झाला नाही.मोदी सरकारने शेतकर्यावर वाईट दिवस अाणले.-भगवान मोरे(शेतकरी).
 
Web Title: marathi news farmer angtiation