शेतकरी संपात फूट पाडण्याचा सरकारचा डाव : शरद पवार

टीम ई सकाळ
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱयांच्या संपात राज्य सरकार फूट पाडत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवार) संध्याकाळी केला. 

शेतकऱयांच्या संपात राज्य सरकार फूट पाडत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवार) संध्याकाळी केला. 

राज्य सरकारने अल्पकर्जधारक शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याचे संकेत शेतकरी संप सुरू झाल्यावर लगेच दिले आहे. तो संदर्भ पवार यांच्या आरोपामागे आहे. 

पवार यांनी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर म्हटले आहे, की अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. शेतकर्‍यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे.

पवार यांनी शेतकरय़ांना मालाची नासाडी न करण्याचे आवाहनही ट्विटरवर केले आहे. 

संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची भूमिका आहे. स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के देण्याबाबतही आग्रही राहावे, असे एका ट्विटमध्ये पवार यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे संप नक्की यशस्वी होईल याबद्दल खात्री वाटते, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

हिंगोली-नांदेड मार्गावर शेतमाल व दूध टाकून रास्‍तारोको
परभणी जिल्ह्यात यंदा मुबलक खत
अण्णा हजारे शेतकरी-सरकार यांच्यात मध्यस्थीसाठी तयार
सोलापूर: दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतणे सुरूच 

Web Title: Marathi News farmers strike Devendra Fadnavis Sharad Pawar