'ते' मी विनोदाने बोललो : गिरीश महाजन यांची दिलगिरी

टीम ई सकाळ
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कोणीतरी टीका केली की माझी उतरली असेल. तेव्हा मी सांगू इच्छितो की मला कुठलेही व्यसन नाही, मी चहा सुद्धा घेत नाही. उलट मी तंबाखू वगैरे असे व्यसन दूर करण्यासाठी उपचार करण्यासाठी वैद्यकीय शिबिर घेतो.
- गिरीश महाजन

मुंबई : "सहज केलेल्या विनोदाचा तो भाग होता. कोणत्याही महिलांना दुःखवण्याचा हेतू नव्हता. माझी काही हजार भाषणे झाली. मी असे कधी केले नाही, चुकीचे बोललो नाही. तेव्हा कालच्या भाषणात माझा असा हेतू माझा नव्हता," असे स्पष्टीकरण देत राज्यातील भाजपप्रणित सरकारमधील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

मद्य उत्पादनांना महिलांची नावे दिली तर त्यांची विक्री नक्कीच वाढेल. सातपुडा चिनी मिलने त्यांच्या दारूला महाराजा असे नाव दिले आहे. ते नाव बदलून त्याऐवजी महाराणी असे नाव दिले तर खप नक्कीच वाढेल, असे महाजन यांनी शहादा येथील कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर महिलांसह विविध संघटनांकडून त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठविली होती. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली. 

महाजन म्हणाले, "तेव्हा त्या अनुषंगाने भाषण करताना मी सहज म्हणालो, माझ्याकडून व्यक्तव्य केले गेले. परवा शहादा तापी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता. त्यामध्ये माझे भाषण झाले. दारू विकली जात नाही हा विषय निघाला. राज्यात 5 - 6 ब्रँड असून, त्यालाच डिमांड आहे, असे सांगण्यात आले. 

माफी मागण्याची मागणी केली आहे. ही नकळत झालेली चूक आहे, तेव्हा दिलगिरी व्यक्त करतो, कोणी दुखावले गेले असेल तर मी माफ़ी मागतो. कोणी टीका केली की माझी उतरली असेल. तेव्हा मी सांगू इच्छितो की मला कुठलेही व्यसन नाही, मी चहा सुद्धा घेत नाही. उलट मी तंबाखू वगैरे असे व्यसन दूर करण्यासाठी उपचार करण्यासाठी वैद्यकीय शिबिर घेतो.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girish mahajan apologise women names liquor remark