बारावीची परीक्षा : अकरानंतर येणार्‍यांना परीक्षेस बसू देणार नाहीत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

मुंबई : बारावीच्या प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सअपवर व्हायल होण्याच्या धस्क्‍यानंतर यंदापासून बोर्डाने कडक नियम सक्तीने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता परिक्षा केंद्रावर अकरानंतर येणा-या विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू दिले जाणार नाही, अशी कडक भूमिका बोर्डाने घेतली आहे. अपवादात्मक स्थितीत विभागीय बोर्डाशी सल्लामसलत केल्यानंतर 11.20 पर्यंत निर्णय घेत विद्यार्थ्यांना परिक्षेस बसू दिले जाणार. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परिक्षा उद्या (बुधवारपासून) सुरु होत आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान बारावीची परिक्षा पार पडणार आहे. 

या परिक्षेसाठी 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसणार आहेत. त्यामध्ये 8 लाख 34 हजार 134 विद्यार्थी तर 6 लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश आहे. राज्यात 2 हजार 822 परिक्षा केंद्रे बारावीसाठी नियुक्त करण्यात आली आहेत. 

गेल्या वर्षी बारावीच्या परिक्षेच्या पहिल्या दिवशीच प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सअपवर व्हायरल झाली. त्यानंतर अजून तीन प्रश्‍नपत्रिका व्हायल झाल्या. या प्रकरणानंतर आता विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर मोबाईल बंदीची सक्ती कडक पद्धतीने पाळली जाईल, शिवाय परिक्षा केंद्र प्रमुखव्यतिरिक्त परिक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतरांनाही मोबाईलवापरावर बंदीची सक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात आता पंचवीस प्रश्‍नपत्रिकांचा संच विद्यार्थ्यांसमोरच फोडला जाईल, या प्रकाराने प्रश्‍नपत्रिका व्हॉट्‌सअपवर व्हायल होण्याच्या पद्धतीला आळा बसेल, असा विश्‍वास मुंबई विभागीय बोर्डाच्या अधिका-यांनी व्यक्त केला. 

शाखानिहाय विद्यार्थ्यांची संख्या 

शाखा विद्यार्थी
विज्ञान 5,80,820
कला 4,79,863
वाणिज्य 3,66,756
व्यावसायिक अभ्यासक्रम 57,693
एकूण विद्यार्थी 14,85,132
Web Title: marathi news HSC Exams Maharashtra SSC Exams