‘कवी कट्टा’साठी कविता पाठवण्याचे आवाहन

Marathi News Kavi Katta Marathi Poem Gazals
Marathi News Kavi Katta Marathi Poem Gazals

बडोदा, गुजरात - येथे १६, १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ या तीन दिवसात संपन्न होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या काव्यवाचन कार्यक्रमासाठी सर्व ठिकाणांवरुन कविता मागवण्यात येत आहेत. 

तरी खाली दिलेल्या पोस्टाच्या पत्त्यावर अथवा ई-मेल पत्त्यावर खालील नियमांस अनुसरून आपली केवळ एक कविता पाठवावी, असे आवाहन ‘कवी कट्टा’ संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. 

नियम पुढीलप्रमाणे -

१. कविता ही स्वरचितच असावी.
२. प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी.
३. कविता ही २० ओळींपेक्षा जास्त मोठी नसावी.
४. साहित्य निवड समिती कवितेची निवड करेल.
५. कवितेचे सादरीकरण ३ मिनिटांत करावे.
६. सादरीकरणानंतर कवीला सन्मानाने प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
७. कवीने स्वतःचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता आणि व्हॉट्स अॅप क्रमांक (असल्यास) पानाच्या वरच्या बाजूला उजवीकडे स्पष्ट अक्षरात लिहावा.
८. कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर ‘कवी कट्टा’ असा स्पष्ट उल्लेख असावा.
९. कविता स्विकारण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०१८ आहे. 
१०. कविता फक्त पोस्ट अथवा मेलवर पाठवावी. व्हॉट्स अॅपवर पाठवलेली कविता ग्राह्य धरली जाणार नाही. 
११. गज़ल, बोलीभाषेतील कविता देखील कवी कट्ट्यातील काव्यप्रकारात अंतर्भूत आहेत.       

कविता पाठवण्यासाठी पत्ता -
मराठी वाङमय परिषद, बडोदे, ‘लक्ष्मी सदन’, पारकर वाडा, दांडिया बाजार, बडोदे, गुजरात. पिन कोड- ३९०००१.   
ई-मेल पत्ता - mvpbkavikatta@gmail.com

वरील बाबतीत काही अडचण असल्यास संयोजन समिती श्री. राजन लाखे (पिंपरी-चिंचवड) दूरध्वनी क्रमांक ९८९२६५५५२६ किंवा श्री. प्रसाद देशपांडे (बडोदे) दूरध्वनी क्रमांक ९६८७६९८२७१, श्री. चंद्रकांत धाडणकर (बडोदे) दूरध्वनी क्रमांक ९४२७३४६३२७ यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com