शेतकरी मोर्चातून नक्षलवाद डोकावतोय - पूनम महाजन

सोमवार, 12 मार्च 2018

नाशिकहून निघालेला लाँग मार्च आज(सोमवार) पहाटे 5 वाजता मुंबईत आझाद मैदानात धडकला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. परंतु भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी एका खासगी वाहिनीला प्रतिक्रीया देताना या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत असल्याचे वक्तव्य केले आहे.

मुंबई- महाराष्ट्र किसान सभेच्या झेंड्याखाली नाशिकहून दरमजल करत रविवारी मुंबईतील सायन येथे पोचलेला शेतकऱ्यांच्या 'लाँग मार्च'च्या माध्यमातून शहरी माओवाद डोकावतोय असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी केले आहे. 

नाशिकहून निघालेला लाँग मार्च आज(सोमवार) पहाटे 5 वाजता मुंबईत आझाद मैदानात धडकला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. परंतु भाजपच्या खासदार पुनम महाजन यांनी एका खासगी वाहिनीला प्रतिक्रीया देताना या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातुन टिका केली जात आहे. 

दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी मोर्चाला सामोरे जाऊन मोर्चेकऱ्यांना सरकारशी चर्चेचे निमंत्रण दिले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे मोर्चाचे नेते अशोक ढवळे, अजित नवले यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांनी कन्नमवार येथे जाऊन मोर्चाल शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसेने या मोर्चास यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांना रविवारी रात्रीच आझाद मैदानाकडे जाण्याचे आवाहन पोलिसांनी केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यास दुजोरा मिळालेला नाही.

हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे...
पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला आहे. 'पायात काटा रुतल्यावर वाहणारं रक्त लाल असतं म्हणून ते माओवादी नसतं. शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामालाही कुठल्याच राजकारणाचा वास नसतो. हा मोर्चा कष्टकऱ्यांचा आहे. न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शहरी माओवादी म्हणणाऱ्यांचा निषेध' असे ट्विट त्यांनी केले. 

Web Title: marathi news kisan long march poonam mahajan statement against farmer