1430 बुलेटप्रुफ जॅकेटस् महाराष्ट्र पोलिसांकडून परत

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

महाराष्ट्र पोलिसांना दिलेले 1430 बुलेटप्रुफ जॅकेट एके-47 बुलेट टेस्टदरम्यान अपयशी झाल्याने पोलिसांनी ही सर्व जॅकेटस् परत केली आहेत.

मुंबई : पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना बुलेटप्रुफ जॅकेटही दिले गेले आहेत. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना दिलेले 1430 बुलेटप्रुफ जॅकेट एके-47 बुलेट टेस्टदरम्यान अपयशी झाल्याने पोलिसांनी ही सर्व जॅकेटस् परत केली आहेत.

bulletproof jacket police

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे पोलिसांची सुरक्षितता लक्षात घेता त्यांना 4600 बुलेटप्रुफ जॅकेटस् देण्यात आली होती. मात्र, यातील 1430 बुलेटप्रुफ जॅकेटस् एके-47 बुलेट चाचणीदरम्यान अपयशी झाली. त्यामुळे ही 1430 जॅकेटस् पोलिसांनी परत पाठवली आहेत. 

याबाबत अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले, की जॅकेट एके-47 बुलेट टेस्टदरम्यान 1400 पेक्षा जास्त जॅकेटस् अपयशी झाली आहेत. त्यामुळे आम्ही ही सर्व जॅकेटस् संबंधित कंपनीला परत केली आहेत. यातील 3000 जॅकेटस् एके-47 बुलेट टेस्टदरम्यान यशस्वी झाली आहेत. 

Web Title: Marathi News Maharashra News 1430 Bullet Proof Jackets Return by Police