बिअरचे 'चिअर्स' महागणार

मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई - बिअरच्या किंमती महाराष्ट्रात पूर्वीपेक्षा महागल्या आहेत. एका माईल्ड बिअरच्या पाईंटची (330 मिली) किंमत 3 रुपयांनी आणि स्ट्राँग बियरच्या पाईंटची किंमत 4.5 रुपयांनी वाढली आहे. माईल्ड बिअरची पूर्ण बाटली (650 मिली) 5 रुपयांनी तर स्ट्राँग बिअरची पूर्ण बाटली 6.5 रुपयांनी महागली आहे. राज्य सरकारने सोमवारी माईल्ड आणि स्ट्राँग बिअरवरील उत्पादन शुल्कात 25 आणि 35 टक्क्याने वाढ केली आहे. 

ब्रॅण्डनुसार बिअरच्या किंमती वेगळ्या आहेत. पण प्रत्येक ब्रॅण्डची अचूक किंमत वाढ पुढच्या एका दिवसात कळेल, असे उद्योगक्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे. स्ट्राँग बिअरवर उत्पादन शुल्कात प्रत्येक लिटरमागे  60 ते 80 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. किंगफिशर, कार्ल्सबर्ग आणि बडवायझर सारख्या ब्रॅण्डच्या पाईंटची किंमत 80 ते 110 रुपये आहे. तर पूर्ण बाटलीची किंमत 150 ते 230 रुपये आहे. महाराष्ट्र सरकार प्रत्येक वर्षी दोन हजार शंभर कोटी रुपये किंमतीची 32.50 लाख लिटर बिअर विक्री करते.       

Web Title: Marathi News Maharashtra Beer Price increased