'घनकचऱ्याच्या डंपिंगसाठी आता जमीन नाही'

दीपा कदम
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई - घनकचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी यापुढे जमीन दिली जाणार नाही, तर यापुढे कचऱ्यावर केवळ प्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला होता. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे कामे सुरू आहेत. नियोजित वेळेत ते टप्प्यात पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधान परिषदेत दिली. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ""पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेत 60 प्रकल्प आहेत. त्याची किंमत चार हजार 701 कोटी आहे. या प्रकल्पातील 10 प्रकल्प पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. 24 प्रकल्पांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. चार प्रकल्पांचे टेंडरिंग झाले आहे. 22 प्रकल्प सविस्तर अहवाल टप्प्यावर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मागणीप्रमाणे पैसे देण्यात येत आहेत. यातील काही प्रकल्प 2019 पर्यंत पूर्ण होतील.'' 

स्मार्ट सिटीमध्ये कचरा डंपिंग करण्यासाठी नव्हे, तर कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा देण्यात आली आहे. या जागेवर कामसुद्धा सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

कॉंग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी पुण्यातील घनकचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर घनकचरा व्यवस्थापनासाठी दहा एकर जागा देण्यात आली आहे. तिथे कचऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे.'' 

पुणे नंबर वन 
घनकचरा व्यवस्थापनात आता राज्यात डंपिंगला परवानगी नाही. यापुढे कचऱ्यावर प्रक्रिया करूनच त्याची विल्हेवाट लावावी लागेल. पुण्यात याबाबतच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. पुण्यातील पाच भागांमध्ये कचरा विघटन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. पुण्यात कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील प्रकल्पांचा विचार करता, पुणे स्मार्ट सिटीबाबत नंबर वन वर राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Web Title: marathi news maharashtra CM vidhan parishad garbage