अटकपूर्व जामिनासाठी मिलिंद एकबोटेंचा अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. 

मुंबई - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला. 

पिंपरीत राहणाऱ्या एका महिलेने एकबोटे आणि "शिवराज प्रतिष्ठान'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात फौजदारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्‍यतेमुळे एकबोटे यांनी पुणे स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र त्यांच्यावरील आरोप गंभीर असल्यामुळे न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news maharashtra koregaon bhima milind ekbote application for anticipatory bail