राज्यात नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा: संचालक राजेश पांडे 

residentional photo
residentional photo

राज्यात नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा: संचालक राजेश पांडे 

नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवार(ता. 22)पासून देशातील 174 शहरांत (सात जिल्ह्यांत) शहरी गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या उपक्रमांतर्गत नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीचे संचालक राजेश पांडे यांनी नुकताच नाशिक दौरा केला. 
देशात 2030 पर्यंत कार्बनडायऑक्‍साईडचे प्रदूषण 33 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवत देशातील प्रदूषण नियंत्रण साध्य करण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे. नैसर्गिक वायूच्या वापरातून पेट्रोल-डिझेलचे अवलंबित्व कमी करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. 
ग्राहकांना घरपोच शाश्‍वत गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत 25 ते 30 टक्के स्वस्तात इंधनाची गरज पूर्ण करता येणार आहे. राज्याने नैसर्गिक वायू इंधन पुरविण्याच्या या उपक्रमात आघाडी घेतली आहे. मुंबई व दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रातील पुणे शहर नैसर्गिक गॅसच्या वापरात आघाडीवर आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. 

नाशिकसह सात जिल्ह्यांचा समावेश 
पुण्यात 1200 बसगाड्या, एक लाख 80 हजार चारचाकी, 50 हजार रिक्षा व सव्वा लाख घरगुती ग्राहक आणि पाच हजार सोसायट्यांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅस पुरविला जात आहे. राज्यात भारत गॅस रिसोर्सेस लि.च्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यात पुण्यानंतर आता नाशिकसह राज्यातील धुळे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, सातारा, सांगली व नगर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यांपैकी नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची भारत गॅस रिसोर्सेस(बीजीआरएल)कडे जबाबदारी आहे. औरंगाबाद, सातारा, सांगली व नगर जिल्ह्यांची एमएनजीएल कंपनीकडे जबाबदारी आहे. 


पंतप्रधान 22 ला साधणार संवाद 
येत्या गुरुवारी (ता. 22) शहरी गॅस योजनेचा प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध शहरांतील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्याअंतर्गत नाशिकमध्ये गुरुवारी (ता. 22) "मविप्र'च्या रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी तीनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधतील. पालकमंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह शहरातील तिन्ही आमदार उपस्थित राहतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com