कृषी विकास योजनेसाठी 308 लाखांची तरतूद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई  - राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील "उन्नत शेती समृद्ध शेतकरी' मोहिमेंतर्गत कृषी जनजागृती प्रकल्प राबवण्यासाठी 308.50 लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली. 2014-15 पासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कृषी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य देण्यात येते. ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, भातलावणी यंत्र, स्वयंचलित यंत्रे, रिपर, एमबी प्लाऊ, डिस्क प्लाऊ, कल्टिवेअर, रोटावेटर, पीकसंरक्षण उपकरणे, मनुष्यचलित अवजारे यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या योजनेंतर्गत कृषी अवजारांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व इतर घटकांच्या लाभार्थींना अनुदान देण्यात येते. उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी जनजागृती प्रकल्प राबवण्यासाठी 308.50 लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. 

आवश्‍यक कागदपत्रे 
या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सादर करायचा आहे. अर्जासोबत सातबारा, आठ-"अ'चा दाखला, अनुसूचित जाती, जमाती व इतर प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्‍स प्रत, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, नागपूर यांच्याकडील साहित्याचे कोटेशन सोबत द्यावे. "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला प्रवर्गातील लाभार्थींना प्राधान्याने लाभ देण्यात येतो. 

प्रशासकीय खर्चासाठी तरतूद (रुपयांत) 
विभागीय कार्यशाळा/चर्चासत्र- सहा लाख 
प्रिंट मीडिया, आकाशवाणी दूरदर्शन, तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी- 177.50 लाख 
नावीन्यपूर्ण घटक (चित्ररथ)- 25 लाख 
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग - 100 लक्ष 
प्रशासकीय निधी/आकस्मिक खर्च - एक टक्का 
एकूण - 308 लाख 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: marathi news maharashtra news agriculture development of agriculture