कोरेगाव भीमा घटनेची न्यायालयीन चौकशी: मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली जाईल. सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झालेला असताना विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले आणि घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

या प्रकरणी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. तीन-साडे तीन लाख लोक तिथे आले होते. काही सामाजिक संघटना, डाव्या कडव्या संघटना यांनी इशारा दिला होता. त्यामुळे वातावरण दंग झाले. ६ पोलिसांच्या कंपन्या डेप्युट केल्या होत्या. पोलिस बंदोबस्त मोठा होता. दंगल घडावी असा प्रयत्न केला जात होता पण पोलिसांनी दंगल घडू दिली नाही. काही गाड्या जाळल्यात, दगडफेक झाली बिकट घटना घडली असती. ज्याचा मृतदेह सापडला त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्यात येणार आहे. हत्या झाली की काय याची सीआयडीकडून चौकशी केली जाईल. सोशल मिडीयातून अफवा पसरवली तर कारवाई केली जाईल. राजकीय नेत्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करु नये. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com