कोरेगाव भीमाच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप: मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई : कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या मुद्द्यावर विधानपरिषद सभागृह तहकूब करावे लागले. 

जानेवारीच्या अगोदर भीमा-कोरेगाव परिसरात काही संघटनांनी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती स्थानिक पोलिसांना माहिती होती. तरिही जाणीवपूर्वक 1 तारखेला पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. दंगल होऊ दिली.  हे ज्यांच्यामुळे घडले त्यांना सरकार अटक करत नाही. सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. यामुळे कोरेगाव भीमाच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. त्यामुळे 289 द्वारे याची चर्चा सभागृहात झाली पाहीजे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

दंगलीच्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. यावेळी राज्यभर कोबिंग ऑपरेशन राबवले गेले. औरंगाबाद येथे एका निष्पाप गरोदर महिलेवर स्वतः सीपींनी कारवाई करत अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे. असा आरोप मुंडे यांनी केला

अॅड. जयदेव गायकवाड म्हणाले, की गेल्या दोनशे वर्षांपासून असंख्य लोक भीमा-कोरेगावला भेट देत आहेत. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊनही दर्शन घेत असतात. मात्र यावर्षी काही समाजकंटक घटकांनी तिथे जमलेल्या अनुयायांवर पूर्वनियोजित असा भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप हल्लेखोर आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक झालेली नाही. याबाबत शासन काय कारवाई करत आहे? याबाबत 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला जाब विचारला. 

सुनील तटकरे म्हणाले, की भीमा-कोरेगावचा प्रश्न गंभीर असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अॅड. जयदेव गायकवाड यांनी विधानपरिषदेत 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारतर्फे ठोस उत्तर मिळावे, अशी अपेक्षा केली. मात्र प्रश्नोत्तरच्या तासातच या प्रश्नाचा निकाल लावावा, हे सरकारमधील सदस्य सांगत असून हे अतिशय दुःखद आहे. 

मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान करत दंगल भडकवली. पोलीसांनी 1 जानेवारी रोजी बघ्याची भूमिका घेतली होती. उलट जे भाविक तेथे आले होत्या अशा 54 हजार लोकांवर पोलीसांनी केसेसे दाखल केल्या. सरकारने एकबोटे व भिडेला लवकरात लवकर अटक करत निष्पाप लोकांवर ज्या केसेस दाखल झाल्यात त्या मागे घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली.

प्रकाश गजभिये म्हणाले, की भीमा-कोरेगाव हे दलितांचे प्रेरणास्थान, स्फूर्तीस्थान आहे. दलितांच्या अस्मिता स्थळावर हल्ला करुन एकप्रकारे जातीव्यवस्था आजही जिवंत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याबाबत सभागृहात चर्चा झालीच पाहीजे. या चर्चेनंतर सभागृहाचे कामकाज 20 मिनिटे तहकूब करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com