मराठी भाषेवरून मुंडेंकडून सरकारी कारभाराचे वाभाडे

प्रशांत बारसिंग
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मराठी भाषा दिन साजरा करीत असतांना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही,भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत.मंत्रालयातील सचिव, आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात.

मुंबई : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यसरकारच्या कारभाराचे विधानपरिषदेत वाभाडे काढले.

मराठी भाषा दिन साजरा करीत असतांना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही,भाषा विभागातील 40 % पदे रिक्त आहेत.मंत्रालयातील सचिव, आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी भाषेत बोलतात. मराठीची उपेक्षा सुरु आहे, अशा शब्दात मुंडे यांनी सरकारी कारभाराची लक्तरे काढली.
 
शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्हे म्हणाल्या की,   मराठी भाषा विषयक सल्लागार  समिती स्थापन करणे  पुरेसे नाही तर त्यांना सक्रिय करण्यास  पुर्नरचना करून निधी व  मनुष्यबळाची व्यवस्था कऱण्याची  गरज आहे.आजचा दिवस हा ऐतिहासिक असून भविष्य व वर्तमानात मराठीला मजबूत करण्यास सरकारने काय पाऊले ऊचललीत यावर सदनात चर्चा व्हावी व ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी डॉ. गोर्हे यांनी केली.

Web Title: Marathi news Maharashtra news Dhananjay Munde marathi