'खडसे' की 'कळसे'?; विधानसभेत पुन्हा 'आरटीआय' ब्लॅकमेलरची चर्चा

विजय गायकवाड
बुधवार, 7 मार्च 2018

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून बेछूट आरोप करतात. लोकप्रतींधींना बदनाम करतात. अशांची चौकशी झाली पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई : लोकप्रतिनिधी आणि माहीती अधिकार कार्यकर्त्यांमधील संघर्षाला आज पुन्हा विधानसभेत तोंड फुटले. आमदार हितेंद्र ठाकुर यांनी लोकप्रतींधींची बदनामी सहन करणार नाही असा इशारा दिला होता. तर माजी मंत्री एकनाथ खडसेंनी बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. विधानसभेत आज पुन्हा हितेंद्र ठाकुर यांनी हा मुद्दा उपस्थित करत विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसेंच्या 'पीए'ने लाच घेतल्याचा आरोप झाल्याचे आपण म्हटले होते. खडसेंच्या 'पीए'ने  नाही. खडसेंचा गैरसमज झाला असून त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.

विधानसभेत मी व्यक्त केलेल्या भाषणांचे अनेक उतारे गायब झाल्याचाही आरोप आ. ठाकुर यांनी केला. राजकिय हेतूने प्रेरित होवून तथ्यहीन आरोप केले जातात. त्याची चौकशी होते. त्यात काहीच तथ्य निघाले नसल्याने आरोप तथ्यहिन निघाल्यावर आरोप करणारांवर काय कारवाई होणार? अशी भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती.

समाजसेवक अण्णा हजारेंनी चांगल्या भावनेने माहितीच्या अधिकाराची निर्मीती केली. परंतु आता 'आरटीआय' ब्लँकमेलरर्सने उच्छाद मांडल्याचे आ. हितेंद्र  ठाकुर यांनी निदर्शनास आणुन दिले होते.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून बेछूट आरोप करतात. लोकप्रतींधींना बदनाम करतात. अशांची चौकशी झाली पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

२५ ते ३० वर्षाच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्री पदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँण्टी करप्शन, सीआयडी, लोकायुक्त मार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जनतेसमोर नाथाभाऊ कसा नालायक आहे हे भासवण्याचा खोडसाळ आरोप करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. अशा पध्दतीचे बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील असे आश्वासन दिले. त्याबरोबर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्याची सूचना केली आहे.

Web Title: Marathi news Maharashtra news eknath khadse and RTI workers