राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीऐवजी गुजरातीत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

तावडे बनले संकट मोचक
राज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. तर, हे अभिभाषण गुजरातीत अनुवादीत झाल्याने विरोधकांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

तावडे बनले संकट मोचक
राज्यपालांचे भाषण सुरू असताना मराठी अनुवाद करन सांगणारे नेहमीचे प्रदीप भिडे नसल्याने मंत्री विनोद तावडे यांनी मराठी वाचन केले.

Web Title: Marathi news Maharashtra news governor Vidyasagar Rao speech