नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

राज्यातील कुपोषणासारखा गंभीर मुद्दा लक्षात घेऊन कुपोषणावर मात करण्यासाठी 21 कोटी 19 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगाना मोबाईल स्टॉल उभारण्यासाठी 25 कोटींची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने विचार सुरु आहे. नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली. 

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सादर केला. राज्यातील विविध विभागांच्या दृष्टीने महत्वपूर्ण तरतूदी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये नागरी आरोग्य अभियानासाठी ९६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गर्भवती गरीब महिलांसाठी 65 कोंटीची तरतूद केली आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टि-स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील कुपोषणासारखा गंभीर मुद्दा लक्षात घेऊन कुपोषणावर मात करण्यासाठी 21 कोटी 19 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगाना मोबाईल स्टॉल उभारण्यासाठी 25 कोटींची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Maharashtra News Health Announcement by Finance Minister Sudhir Mungantiwar