जलसंपदा विभागासाठी 8233 कोटींची तरतूद : मुनगंटीवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

''समुद्र किनाऱ्यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जलसंपदा विभागासाठी 8233 कोटींची तरतूद करण्यात आली आहे'',.

- सुधीर मुनगंटीवार,  अर्थमंत्री

मुंबई : मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध करण्यात आला आहे. 'पंतप्रधान कृषी सिंचन' योजनेअंतर्गत समावेश असलेल्या राज्यातील 26 प्रकल्पांकरिता 3 हजार 115 कोटी 21 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभागासाठी 8,233 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत दिली.  

2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार सादर केला. यावेळी मुनगंटीवार यांनी विविध योजनांसाठी आर्थिक तरतूदींची घोषणा केली. ''कोकणातील खार बंधाऱ्यांच्या बांधकामांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून, अस्तित्वातील खार बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जातील. या कामासाठी 60 कोटींची भरीव तरतूद केली गेली आहे. तसेच समुद्र किनाऱ्यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जलसंपदा विभागासाठी 8233 कोटींची तरतूद करण्यात आली आहे'', असे मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Marathi News Maharashtra News Irrigation Department will allot Rs 8233 Crores say Sudhir Mungantiwar