'ढ' लोकांच्या भरोश्यावर राज्याचा कारभार सुरू: जयंत पाटील

गुरुवार, 8 मार्च 2018

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी बोगस विद्यार्थ्यांनी स्थगन प्रस्ताव दाखलं केला. तो स्थगनचा विषय होत नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरत गोंधळ घातला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून ' एमपीएससीचा घोटाळा करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार, नही चलगे नही चलगे दादागिरी नही चलेगा, पकोडा बाज सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

मुंबई : बोगस उमेदवार बसवून एमपीएससीच्या परिक्षा पास होवून अनेकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. तशा 'ढ' लोकांच्या भरोश्यावर राज्याचा कारभार सुरू आहे. त्या सगळ्यांची हाकलपट्टी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील विधानसभेत केली. एमपीएससीच्या बोगस भरती प्रकरणी विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी बोगस विद्यार्थ्यांनी स्थगन प्रस्ताव दाखलं केला. तो स्थगनचा विषय होत नसल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरत गोंधळ घातला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून ' एमपीएससीचा घोटाळा करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, विरोधकांचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार, नही चलगे नही चलगे दादागिरी नही चलेगा, पकोडा बाज सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते विखे पाटील म्हणाले, "लाखो विद्यार्थ्यांच्या संबंधीत गंभीर प्रश्न आहे. यासंबंधी सत्यता काय आहे हे कळू द्या. सरकार कोणाला पाठिशी घालत आहे ? बोगस लोकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. राज्यात दहा हजार बोगस आधिकारी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थगन प्रस्तावावर स्विकारण्यात यावी अशी मागणी विखे पाटील यांनी लावून धरले.

या मागणीवर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले की, "हा विषय इतका गंभीर आहे तर त्यावर नियम 293 अन्वये, तुम्ही प्रस्ताव दाखल करा. हा स्थगनचा विषय होत नाही. त्यामुळे मी स्थगन प्रस्ताव नाकारतो." विरोधकांची मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

Web Title: Marathi news Maharashtra news Jayant Patil criticize government